@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता लिपिक या पदावर नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे , सदर पदांकरीता कोणत्याही प्रकारची टायपिंगची आवश्यक देखिल असणार नाही , केवळ 12 वी पात्र उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे .
पदांचे नावे : यांमध्ये कनिष्ठ विभागातील लिपिक , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा पदांच्या तब्बल 3,712 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयाची अट : आपले वय हे दिनांक 01.08.2024 रोजी 18 वर्षे पुर्ण असावे लागेल तर , कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असावे लागेल , तर आपण अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गांमध्ये मोडत असाल तर आपणांस वयांमध्ये 05 वर्षांची सुट मिळेल तर आपण इतर मागास प्रवर्गांमध्ये मोडत असाल तर आपणांस वयांमध्ये 03 वर्षांची सुट मिळेल .
पगार किती मिळेल : यांमध्ये कनिष्ठ लिपिक / सचिवालय सहाय्यक पदांस सातव्या वेतन आयोगानुसार 19900-63200/- या वेतनश्रेणीत वेतन + इतर लागु असणारे देय भत्ते अनुज्ञेय असतील तर डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरीता 25500-81100/- या वेतनश्रेणीत वेतन + इतर देय भत्ते अनुज्ञेय असतील .
सदर वरील सर्व पदांसाठी फक्त 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर कोण्त्याही टायपिंगची आवश्यक असणार नाही , तर डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरीता उमेदवार हे 12 विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज कसा कराल ? सदर पदांकरीता आवेदन करण्यासाठी आपण इच्छुक असाल तर , खालील नमुद संकेतस्थळावर क्लिक करुन सविस्तर आवेदन तसेच सविस्तर भरती जाहीरात पाहु शकता ..