@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee hra increase news ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये वाढ होणे नियोजित आहे , कारण सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार , घरभाडे भत्ताचे दर हे महागाई भत्ताच्या वाढीवर अवलंबून ठेवण्यात आलेले आहेत .
सातवा वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे ज्यावेळी महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी घरभाडे भत्ता ( HRA ) चे दर सुधारित करण्यात येतील . केंद्र सरकारने दिनांक 01 जुलै 2024 डी.ए चे दर 53 टक्के सुधारित करण्यात आल्याने , घरभाडे भत्तांमध्ये सुधारित आवश्यक आहे .
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार मुळ वेतनाच्या 27 टक्के , 18 टक्के व 9 टक्के घरभाडे भत्ता मिळतो . तर आता डी.ए चे दर वाढल्याने , घरभाडे भत्तांमध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार मुळ वेतनांच्या 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी वाढ होणार आहे .
या नियमांचे करावे लागणार पालन : घरभाडे भत्ताचा लाभ घेण्यासाठी , यानंतर अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करावे , लागणार आहेत . याशिवाय पती / पत्नी यापैकी दोन्ही शासन सेवेत ( यांमध्ये केंद्र / राज्य / पालिका प्रशासन / महामंडळे ) कार्यरत असल्यास दोन्हीपैकी एकास घरभाडे भत्ताचा लाभ घेता येणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !