सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढणार ; तर ह्या नियमांचे काटेकोरपणे करावे लागणार पालन ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee hra increase news ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये वाढ होणे नियोजित आहे , कारण सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार , घरभाडे भत्ताचे दर हे महागाई भत्ताच्या वाढीवर अवलंबून ठेवण्यात आलेले आहेत .

सातवा  वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे ज्यावेळी महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी घरभाडे भत्ता ( HRA )  चे दर सुधारित करण्यात येतील . केंद्र सरकारने दिनांक 01 जुलै 2024 डी.ए चे दर 53 टक्के सुधारित करण्यात आल्याने , घरभाडे भत्तांमध्ये सुधारित आवश्यक आहे .

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार मुळ वेतनाच्या 27 टक्के , 18 टक्के व 9 टक्के घरभाडे भत्ता मिळतो . तर आता डी.ए चे दर वाढल्याने , घरभाडे भत्तांमध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार मुळ वेतनांच्या 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी वाढ होणार आहे .

या नियमांचे करावे लागणार पालन : घरभाडे भत्ताचा लाभ घेण्यासाठी , यानंतर अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करावे , लागणार आहेत . याशिवाय पती / पत्नी यापैकी दोन्ही शासन सेवेत ( यांमध्ये केंद्र / राज्य / पालिका प्रशासन / महामंडळे ) कार्यरत असल्यास दोन्हीपैकी एकास घरभाडे भत्ताचा लाभ घेता येणार आहे .

Leave a Comment