बजेटपुर्वीच करा या शेअरची खरेदी ; मिळेल सर्वाधिक परतावा !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ share market investment ] : सध्या शेअर मार्केट मध्ये उतरती कळा पाहायला मिळत आहे , मागील 6 महिन्यांपासून विदेशी गुंतवणुकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याने , भारतीय शेअर बाजारांमध्ये निच्चांकी पाहायला मिळत आहे . परंतु आता केंद्रीय बजेट सादर झाल्याच्या नंतर शेअरच्या किंमती परत वाढताना दिसणार आहेत .

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी भारत सरकाच्या संरक्षण व एअरोस्पेस क्षेत्राकरीता उपकरणे निर्मिती करते . ज्यांमध्ये संरक्षण क्षेत्रातील उपकरणांचा 80 टक्के पेक्षा अधिक वाटा आहे , आता अर्थसंकल्पांमध्ये आणखीण विशेष तरतुदीच्या अपेक्षा असल्याने , सदर शेअरच्या किंमती आणखीण वाढण्याची मोठी शक्यता आहे .

टाटा स्टिल : टाटा स्टिल कंपनी आपल्या उत्पादनाचा मोठा हिस्सा निर्यात करत असते , नुकतेच युरोपिय देशांकडून मोठे कॉन्ट्रक्ट या कंपनीला मिळाले असल्याने , केंद्रीय बजेट नंतर या कंपनीच्या शेअरच्या किंमती वाढू शकतील असा तज्ञांचा अंदाज आहे .

Indian Railway Finance Corp. : या शेअरची किंमत 210 रुपये वरुन 142/- रुपये पर्यंत खाली आलेली आहे , ही कंपनी भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांना अर्थसहाय्य करते , तसेच अर्थसंकल्पांमध्ये रेल्वे बजेटवर अधिक भर दिली जाईल , ज्यामुळे या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळने नुकतेच बिमा सखी योजना लाँच केली आहे , ज्या माध्यमातुन महिलांना रोजगार देण्याची व विमा एजंटच्या संख्येत वाढ करण्याची संकल्प केला आहे . तसेच ही कंपनी भांडवलीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने , या कंपनीच्या शेअरची किंमत अर्थसंकल्पानंतर परत वाढू शकतील , असा तज्ञांचा अंदाज आहे .

( टीप : शेअर मध्ये गुंतवणुक करण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा . )

Leave a Comment