@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने मारवाडी लोक यशस्वी व्यवसाय करतात व ते पिढ्यानपिढ्या टिकवून देखील ठेवतात . यामुळे या लोकांकडून व्यवसाय कशा पद्धतीने करावा व ते कसे टिकवावे याबाबतचा नेमका फंडा कोणता ? ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
राजस्थान मधील पश्चिम राजस्थानमध्ये वास्तव्य करणारे मारवाड या प्रांतातील लोक तेथील कमी पाऊस ,उत्पन्नाचे कमी स्त्रोत यामुळे देशभरात विस्थापले आहेत . त्यांची व्यवसाय करण्याची विशिष्ट कला आहे . ते त्यांना जन्मताच / कुटुंबातूनच शिकवले जाते . यामध्ये कमीत – कमी खर्च तर , जास्तीत जास्त बचत करणे, सर्वात जास्त पैसा कमावणे , जास्तीत जास्त दान करणे हे त्यांचे आयुष्य जगण्याचे सूत्र आहेत . त्यांचे व्यवसाय करण्याची एक वेगळीच कला आहे , त्यामुळे आपल्याला गावागावांमध्ये मारवाडी लोक व्यवसाय करताना दिसतात , मारवाडी ही एक जमात नसून मारवाड प्रांतातील लोक म्हणजेच मारवाडी होय .
कमी किंमत जास्त ग्राहक : मारवाडी लोकांचे पहिला व्यवसाय फंडा म्हणजे वस्तूंची कमीत कमी किंमत तर जास्तीत जास्त ग्राहक मिळवणे हा आहे . ज्यामुळे प्रथम व्यवसायामध्ये नफा कमवण्यापेक्षा ग्राहकांची संख्या वाढवणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे व्यवसाय उन्नतीसाठी सर्वात जास्त फायदा होत असतो . कमी किमतीमुळे इतर ग्राहक त्यांच्याशी जोडले जाते , याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मुकेश अंबानी यांनी जिओ लॉन्च केल्यानंतर सर्वांना मोफत कॉलिंग, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली होती , त्यानंतर हळूहळू ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर जिओचे रिचार्ज किमतीमध्ये वाढ करण्यात आली , अशाप्रकारे नफा कमवला जातो.
ग्राहकांशी चांगले वागणूक ठेवणे : व्यवसाय करीत असताना मारवाडी लोक ग्राहकाशी चांगल्या प्रकारे वर्तणूक करीत असतात त्यांच्याशी गोड बोलणे हा महत्त्वाचा गुण त्यांच्यात असतो ज्यामुळे ग्राहक त्यांच्याशी जोडले जातात याच गुणामुळे त्यांच्या व्यवसाय निरंतर चालू राहण्यास मदत होते.
दीर्घ कालावधी करिता व्यवसायाची रचना : मारवाडी लोकांची खासियत म्हणजे दीर्घ कालावधी करिता व्यवसायाची प्लॅनिंग केली जाते ,त्यानुसार ते आपला व्यवसाय सुरू ठेवत असतात .ज्यामुळे भविष्यात त्यांचा व्यवसाय मोठ्या पटीने वाढण्यास मदत होते. जसे की लहान दुकानापासून ते मॉल पर्यंत आपला व्यवसाय कसा भरभराटी जाईल अशी रचना केली जाते .
स्ट्रॉंग नेटवर्किंग : मारवाडी लोकांचे नेटवर्किंग देशांमध्ये नाही तर जगामध्ये सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे , ज्यामुळे कमी मार्जिन मध्ये त्यांना वस्तू मिळतात , जेणेकरून त्यांना इतर व्यापाऱ्यापेक्षा कमी दराने वस्तू विकण्यास मदत होते . ज्यामुळे अधिक अधिकाधिक ग्राहक त्यांच्याशी जोडले जातात .
कमी व्याजदरामध्ये कर्ज सुविधा : मारवाडी लोकांची वेगळी बँक अस्तित्वात आहे , ज्यातून त्यांना अत्यल्प व्याजदराने कर्ज मिळते, व्याजदर अत्यल्प असल्याने, त्यांना व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये लोन प्राप्त होते जेणेकरून त्यांना व्यवसाय वाढीसाठी मोठा आर्थिक फायदा होत असतो .