@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कृषी पदवीधारकांना शेती – क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कमी व्याजदरांमध्ये मुदत कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते , या योजना मधुन लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता , तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर योजनाची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आवश्यक पात्रता : या योजनांच्या माध्यमातुन राज्यातील कृषी विद्यापीठे / भारतीय कृषी विद्यापीठ / अनुदानित विद्यापीठ अंतर्गत कृषी पदविका आणि राज्य कृषी विद्यापीठांच्या संबंधित विषय , कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी असेलेले पदवीधर आणि संबंधित विषय अर्हता असणाऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते .
मिळणारी कर्जाची रक्कम : या योजनांच्या माध्यमातुन बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक व्यक्तीस कमाल 10 लाख रुपये तर ग्रुप ( 2 सभासद ) यांना जास्तीज जास्त 50 लाख रुपये इतकी कर्जाची रक्कम दिली जाते .
या योजनेचा मुख्य उद्देश : या मुदत कर्ज योजनांतुन कर्जदारांना कृषी चिकित्सालय स्थापना करणे तसेच शेती व्यवसाय केंद्रे उभारणीकरीता मुदत कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते .
व्याजदर / परतफेडीचा कालावधी : 01 वर्षे MCLR + BSS @ 0.50 % व्याजदर आकारले जाते . परतफेडीकरीता 05 वर्षे ते 10 वर्षापर्यंत अवधी दिला जातो .
सदर योजनांच्या माध्यमातुन कर्ज सुविधा घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे : सात बारा , 8 अ उतारा , चतु : सिमा , इतर बँकाचे नादेय प्रमाणपत्र , हमीपत्र , अर्जाचा नमुना इ. कागदपत्रांची आवश्यक असेल .
अधिक माहितीसाठी CLICK Here