@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री कामगार मानधन योजनांच्या माध्यमातुन देशातील कामगार , बांधकाम कामगार , उसतोड कामगार , घरकाम करणाऱ्या महिला वयाच्या 60 वर्षाच्या नंतर दरमहिन्याला 3000/- रुपये पेन्शन आर्थिक लाभ मिळणार आहेत . या योजनाच्या अटी शर्ती / मिळणारे आर्थिक लाभ व आवश्यक अर्हता या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आवश्यक पात्रता : या योजनाच्या माध्यमातुन शेतकरी ज्याची जमी 2 हेक्टर पेक्षा कमी आहे , तसेच ज्याचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तसेच ज्याचे मासिक उत्पन्न हे 15,000/- रुपये पेक्षा कमी असावेत , तसेच सदर लाभार्थी हा EPFO , NPS , ESI चा सभासद नसला पाहिजे .
आवश्यक कागतपत्रे : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता आपणास आधार कार्ड , बँक पासबूक आवश्यक असणार आहेत.
मासिक 3,000/- लाभ कसा मिळतो ? या योजनांच्या माध्यमातुन आपणास प्रतिमहा किमान 55/- पये गुंतवणक करावी लागते , जी कि वयाच्या 60 वर्षाच्या नंतर आपणांस पेन्शन स्वरुपात दिली जाते , यांमध्ये आपण जेवढी रक्कम भरतो , तेवढी रक्कम केंद्र सरकारकडून आपल्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येते , म्हणजेच 55/- रुपये आपण यांमध्ये गुंवणूक केल्यास सरकार देखिल 55/- रुपये सदर खात्यांमध्ये जमा करेल .
या योजनांच्या माध्यमातुन आपणांस दरमहीन्याला रुपये 55/- ते 200/- रुपये वयांनुसार गुंतवणूक करावील लागते , तर लाभार्थ्याच्या वयाच्या 60 वर्षाच्या नंतर 3,000/- इतकी रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाते . ज्यामुळे उतारवयांमध्ये आपणांस मासिक खर्च भागविल जाईल इतकी रक्कम फक्त अल्प गुंतवणुकीत फायदा मिळतो .
या योजनातील लाभार्थीचा 60 वर्षापुर्वीच मृत्यु झाल्यास ,वारसदारास सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ प्राप्त होतो .
लाभ कसा घ्याल / अर्ज कसा कराल ? : या योजनेचा लाभ घेण्याकरीता ई-सेवा केंद्राशी भेट देवून लाभ घेवू शकता भेट देवून ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करु शकता .. ही योजना केंद्र सरकार मार्फत सन 2019 पासून राबविण्यात येते , या योजनाची मुदत ही वयाच्या 60 वर्षानंतर असणार आहे .