@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ After the decision to increase DA of state employees, house rent allowance also increased ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीच्या निर्णयानंतर घरभाडे भत्ता मध्ये देखिल मोठी वाढ होणार आहे . सदर घरभाडे भत्तामधील वाढ ही दि.01.07.2024 पासुनच लागु करण्यात येणार आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 05.02.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे नियोजित करण्यात आले आहेत . सदर निर्णयांमध्ये सातवा वेतन आयोगातील एचआरए नियोजित करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सातवा वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता मधील वाढीनुसार , घरभाडे भत्ता मध्ये वाढ निश्चित करण्यात आलेली आहे . सदर घरभाडे भत्ताचे दर हे सातवा वेतन आयोगांमध्ये ज्यावेळी महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी घरभाडे भत्ताचे दर हे सुधारित करण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहेत .
असे असतील सुधारित घरभाडे भत्ता : वित्त विभागाच्या दिनांक 25.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे . यामुळे महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाले आहेत .
यामुळे आता घरभाडे भत्ताचे दर हे शहरांचे / गावांचे वर्गीकरणानुसार अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी वाढ करणे नियोजित आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …


आपण जर कर्मचारी , निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
