@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 05 important decisions were taken in the cabinet meeting held on 25.02.2025. ] : दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 05 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते .
01.नागरी सुविधा करीता कृती कार्यक्रम : राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात सन 1976 पुर्वीचे असणारे पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या तब्बल 332 गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून , याकरीता 599 कोटी 75 लाख रुपये इतकी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .
02.राज्य आधारसामग्री ( डेटा ) धोरण प्राधिकरणाची स्थापना : राज्यातील विविध विभागात माहितीचे प्रभावीपणे तसेच पारदर्शक वापराकरीता राज्य आधारसामगी म्हणजेच डेटा धारेण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे .
03. पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी : परळी ( जिल्हा बीड ) व बारामती ( जिल्हा पुणे ) येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपुर अंतर्गत नविन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयाची स्थापना करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे .याकरीता 671 कोटी 77 लाख व 93 हजार रुपये इतक्या निधीची तरतुद करण्यात आली आहे .
04.राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते प्रदान बाबत निर्णय : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्याकरीता त्याचबरोबर महामंडळ यांच्या अतिरिक्त निधीची गुंतवणुक ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे .
05.पुणे येथे कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी : पुणे जिल्हा येथील पौड या ठिकाणी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास व त्या कार्यालयात 12 नियमित पदे तर 04 बाह्य पदांना मंजूरी देण्यात आलेली आहे .
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !