@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Issued on 20.06.2025 regarding linking of state government employees to a single system from appointment to retirement ] : राज्य कर्मचाऱ्यांचे नियुक्ती ते सेवानिवृत्ती पर्यंत एकच प्रणाली संलग्न करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 20 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांनुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत प्रदान करण्यात येणारे सेवाविषयक लाभ जसे स्थायित्व प्रणापत्र , वेतनविषयक लाभ तसेच सेवेतील नियमित दिनांक , सेवानिवृत्ती वेतन , उपदान , रजा रोखीकरण इ. वेळेवेर व सुलभरित्या देणे शक्य व्हावे , याकरीता शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्ती ते निवृत्ती पर्यंतच्या सेवा एकाच प्रणालीशी संलग्न करण्याचा मानस आहे .
यासाठी राज्य सरकारी कर्मचारी हा केंद्रीभूत ठरवून , कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी करीता येणाऱ्या विविध कार्यवाहींच्या प्रक्रियेचे स्वयंचलन होण्याच्या दृष्टीने , महा – आस्था प्रणाली विकसित करण्यात येत आहे .
महा- आस्था कक्षाची रचना : सह / उप सचिव ( आस्थापना ) – अवर सचिव / कक्ष अधिकारी – सहायक कक्ष अधिकारी -लिपिक टंकलेखक -शिपाई अशी रचना असणार आहे .
महा-आस्था कक्षाने करावयाची कामे : मंत्रालयीन खुद्द विभागातील ज्या कर्मचाऱ्यांकडे शासकीय ई-मेल आयडी अद्याप उपलब्ध नाहीत , शा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध करुन घेण्यात यावेत , याचा उद्देश प्रामुख्याने महा – आस्था प्रणालीचा वापर करण्यासाठी होणार आहे .
सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकातील दि.25.07.2025 पर्यंतच्या सर्व नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ लागु करण्याची तारीख निश्चित ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.20.06.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” पर्यंत एकच प्रणाली संलग्न करणेबाबत निर्गमित दि.20.06.2025
- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !