@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big increase in this allowance of state officers/employees; Government decision issued on 20.06.2025 ] : सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , गणवेश भत्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उप-विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
या निर्णयांनुसार सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत राजशिष्टाचार उप-विभाग मध्ये कार्यरत राज्य अतिथीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांना 02 वर्षातून एकदा दिला जाणारा प्रति कर्मचारी एकुण तीन गणवेश खाली नमुद करण्यात आलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे .
पदनाम | वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी / प्रति गणवेश ( रुपये ) | सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी / प्रति गणवेष ( रुपये ) |
व्यवस्थापक | 6500/- | 9000/- |
सहा.व्यवस्थापक | 6500/- | 8450/- |
मुख्य बटलर | 6500/- | 8450/- |
भांडारपाल | 6500/- | 8450/- |
बटलर | 4500/- | 5850/- |
खानसामा | 4000/- | 5200/- |
किचन हेल्पर | 3000/- | 3900/- |
स्टोअरमन | 3000/- | 3900/- |
शिपाई | 3000/- | 3900/- |
वरीलप्रमाणे गणवेश भत्यात सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे . सदर सुधारणा अटी / शर्तींच्या अधीन राहून मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !