ग्रामीण भागांमध्ये राहून महिना काठी लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार : ग्रामीण भागांमध्ये राहुन प्रति महा लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय आहेत , जे व्यवसाय करतानां ग्रामीण भागात सहज करता येईल . तसेच शासनांच्या योजनांचा देखिल लाभ मिळेल , असे कोणकोणते व्यवसाय / उद्योग आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्येच अधिक प्रमाणात केला जातो , कारण कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना पोषक असणारे वातावरण ग्रामीण भागांमध्येच मिळते . कुक्कुटपालनाकरीता प्रथम शेड बांधणे आवश्यक असते ,त्यानंतर कोंबड्यांसाठी आवश्यक खाद्याची व्यवस्था केल्यानंतर कुक्कुटपालन करुन महिना चांगले उत्पन्न मिळवू शकतो . कुक्कुटपालन करीता राज्य शासनांकडून अनुदान योजना राबविण्यात येते , यातुन सबसिडी घेवून कुक्कुटपालन हा व्यवसाय करु शकता ..

दुग्धव्यवसाय : राज्य शासनांकडून दुधाळ जनावरे यांमध्ये गायी व म्हशी खरेदी करण्याकरीता अनुदान तसेच कर्जे उपलब्ध करुन दिले जाते . आपण जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केल्यास , जसे कि 20 ते 30 गायी – म्हशींचे पालन दुग्धव्यवसायाकरीता केल्यास , आपण प्रतिमहा 50 ते 1 लाख रुपये पर्यंत आर्थिक फायदा मिळवू शकता ..

शेळीपालन : शेळीपालन हे प्रामुख्याने मास विक्री करता केला जातो , यांमध्ये बोकड जन्‍मास आल्यास अधिक आर्थिक फायदा मिळतो . शेळी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केल्यास निश्चित आपण प्रतिमहा 1 लाख रुपये पर्यंतचा आर्थिक फायदा मिळवू शकतो . शेळी पालन करण्यासाठी राज्य शासनांकडून अनुदान योजना तसेच कर्जे उपलब्ध करुन देण्यात येते .

विटभट्टी : विट तयार करण्याचे काम ग्रामीण भागांमध्ये सहज करता येते , याकरीता आवश्यक असणारे मनुष्यबळ ग्रामीण भागात सहज उपलब्ध होते . विटांचा व्यवसाय हा ग्रामीण भागात तसेच विट तयार करुन शहरी भागांमध्ये देखिल विक्री करु शकतो , जे कि शहरी भागांमध्ये वीटांची सर्वाधिक मागणी असते .

मत्स्यपालन : मत्स्यपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्ये उत्तमरित्या करता येतो , याकरीता पाण्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात असणे आवश्यक असते .मत्स्यपालन करीता आधुनिक मत्स्यबिजांचा वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करुन केल्यास , निश्चितच चांगला आर्थिक फायदा होईल .

Leave a Comment