@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions issued regarding payment of salaries/arrears ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 11.02.2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.थकीत वेतन GR : शालेय शिक्षण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा न केल्याबाबत , मा. उच्च न्यायालय मुंबई , खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत .
मा.न्यायालयाने सदर अवमान याचिका मधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 57,56,380/- ( अक्षरी सत्तावन्न लक्ष छपन्न हजार तिनशे ऐंशी रुपये फक्त ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे .
तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास , शिक्षण संचालक ( प्राथमिक ) पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
वेतन अनुदान GR : शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 11.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 2024-25 चे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहेत . सदरचे अनुदान बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !