राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.11.02.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions issued regarding payment of salaries/arrears ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 11.02.2025 रोजी  02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.थकीत वेतन GR : शालेय शिक्षण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा  न केल्याबाबत , मा. उच्च न्यायालय मुंबई , खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत .

मा.न्यायालयाने सदर अवमान याचिका मधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 57,56,380/- ( अक्षरी सत्तावन्न लक्ष छपन्न हजार तिनशे ऐंशी रुपये फक्त ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे .

तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास , शिक्षण संचालक ( प्राथमिक ) पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

वेतन अनुदान GR : शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 11.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 2024-25 चे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहेत . सदरचे अनुदान बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .

या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment