@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR regarding appointment of contractual teachers in accordance with Teacher Recruitment Phase – 2 GR regarding superseding ] : शिक्षक पदभरती टप्पा -02 च्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत डी.एड , बी.एड अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 10.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसर नमुद करण्यात आले आहेत कि , स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या शाळेत 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असले अशा शाळेत डी.एड / बी.एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास दिनांक 23.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती .
नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये , यास्तव तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली होती , सन 2022 च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरती दुसरा टप्पा दिनांक 20.01.2025 रोजी प्रत्यक्षात सुरु झालेला आहे .
त्यामुळे ज्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे , त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असणाऱ्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल , तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालु राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही . असे नमुद करण्यात आले आहेत .

- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !
- राज्यातील सर्व शाळांचे नविन अभ्यासक्रमानुसार कामाचे दिवस , विषय निहाय तासिक व सुधारित वेळापत्रक जाहीर !
- शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत , शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित दि.17.06.2025
- SGSP : भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती !