राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State Teaching & Non Teaching Staff nps scheme start shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय अखेर राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत घेण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करण्यात आलेला आहे .

सदरच्या शान निर्णयानुसार दि.01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजे DCPS लागु असणाऱ्या दिव्यांगाच्या मान्यताप्राप्त तसेच अनुदानित विशेष शाळा तसेच कार्यशाळा त्याचबरोबर मतिमंद मुलांचे बालगृहामधील 100 टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांवर नियुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( NPS ) लागु करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित / मान्यता प्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे जसे कि , कंत्राटी पद्धतीने , विशिष्ट सिमित कालावधीकरीता , एखाद्या प्रकल्पाकरीता , प्रकल्पाच्या कालावधी पुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांस सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागु राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती ही विहीत पद्धतीने , नियमित वेतनश्रेणीतील नियमित पदांवर सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने झालेले असणे आवश्यक असेल , अशाच पदांवरील कर्मचाऱ्यांना सदरची पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे ..

तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी 100 टक्के अनुदानावरील शाळेतील 100 टक्के अनुदानित नियमित पदांवर आहेत , याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

या संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता CLICK HERE (GR PDF)

Leave a Comment