@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mobile use shasan nirnay ] : राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतच्या शिष्टाचाराबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.07.2021 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , कार्यालयीन कामाकरीता दुरध्वनीचा वापर करताना प्राथ्यम्याने कार्यालयामधील दुरध्वनीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाकरीता आवश्यक असेल तेंव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावे , असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच भ्रमणध्वनीवर बोलत असताना सौजन्यपुर्ण भाषेचा वापर करण्याचे तसेच बोलत असताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच भ्रमणध्वनीवर बोलत असताना , सौजन्यपुर्ण भाषेचा वापर करण्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच कार्यालयीन कामाकरीता भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा शक्यतो वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून , मोबाईल फोनवार बोलताना कमीत कमी वेळेत संवाद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
याशिवाय अत्यावश्यक वैयक्तिक दुरध्वनी , कक्षाचे बाहेर जावून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी हा Silent / Vibrate mode वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात /बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे , संदेश तपासणे , Ear Piece / Ear Phone वापरणे अशा बाबी टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच कार्यालयीन कामाकरीता दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !