भारतीय स्टेट बँकेने मागील वर्षी बँकेच्या ऑपरेशन्स करिता उप कंपनी म्हणून ऑपरेशन्स स्पोर्ट सर्विसेस सुरू केली आहे . सदर उप कंपनीच्या शाखा विस्तार करण्याकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे .बँकेचे ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने राबवण्यात यावे , याकरिता देशांमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 300 शाखा उघडण्यात येणार आहेत .
सन 2023 – 24 या आर्थिक वर्षामध्ये सदर उप कंपनीच्या एकूण 149 शाखा उघडण्यात आलेले आहेत . स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अध्यक्ष दिनेश खारा माहिती देताना सांगितले की , यंदाच्या वर्षी बँकेत प्रोफेशनरी ऑफिसर्स श्रेणीतील तब्बल 11 ते 12 हजार पदांची नियुक्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे .
बँकेचे ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने राबवण्यात यावे , याकरिता देशांमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 300 शाखा उघडण्यात येणार आहेत . सन 2023 – 24 या आर्थिक वर्षामध्ये सदर उप कंपनीच्या एकूण 149 शाखा उघडण्यात आलेले आहेत . स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अध्यक्ष दिनेश खारा माहिती देताना सांगितले की , यंदाच्या वर्षी बँकेत प्रोफेशनरी ऑफिसर्स श्रेणीतील तब्बल 11 ते 12 हजार पदांची नियुक्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे .
तर अधिकारी व इतर लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर देखील मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असून , त्याचा आकडा चार ते पाच हजार इतका असणार आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया (STATE BANK OF INDIA ) ही बँक भारत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील (राष्ट्रीयकृत ) बँक असून , भारतामध्ये सर्वाधिक शाखा असणारी बँक आहे . दरवर्षी बँकेच्या शाखा विस्तार करिता मनुष्यबळ कमी पडतो यामुळे दरवर्षी नव्याने पद भरती प्रक्रिया राबवण्यात येते .
याशिवाय रिक्त पदांचा आकडा दरवर्षी वाढत जातो , पदभरती प्रक्रिया करिता मोठा विलंब होत असल्याने , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मानधन तत्वावर घेण्यात येते , त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून अनेक पदे हे आऊटसोर्सिंग तसेच बाह्यस्त्रोत द्वारे भरले जाते .
यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकामुळे बँकेच्या उप कंपनीच्या शाखा विस्तार होऊ शकले नाही . परंतु निवडणुकीनंतर देशामध्ये या उप कंपनीच्या शाखा मोठ्या प्रमाणात वाढवले जाणार आहेत . सदर शाखे करिता देशामध्ये तब्बल 15 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांची पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . यामुळे देशातील सुशिक्षित (educated candidates) बेरोजगार तरुणांना जॉब ची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे .