@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important matters in Maharashtra’s economic crisis; Provision of special funds for this work.. ] : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असुन , काल दिनांक 10.03.2025 रोजी राज्याचे वित्त मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये काही विशिष बाबीसाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .
स्टीब हब : जिल्हा गडचिरोली येथे स्टील हब तयार करण्यासाठी या जिल्हामध्ये खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करणे कामी रुपये 500/- कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र : राज्यात वांद्रे -कुर्ला , वडाळा , गोरेगाव , कुर्ला – वरळी , नवी मुंबई , खारखर , विरार बोईसर अशा 07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत .
- सामुहिक प्रोत्साहन योजना अंतर्गत रुपये 6,400/- कोटी इतका निधी अनुदान मंजूर करण्यास मान्यता .
- लाडकी बहीण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करीता महिला व बाल विकास योजनासाठी तब्बल 31,907 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली .
- उर्जा विभागास 21,534 कोटी रुपयाची तरतुद .
उर्वरित प्रमुख विभाग व विभाग निहाय अर्थसंकल्पीत निधी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
| विभागाचे नाव | अर्थसंकल्पीत निधी |
| सार्वजनिक बांधकाम ( रस्ते ) – सार्वजनिक उपक्रम वगळून | 19,079 कोटी रुपये |
| जलसंपदा | 15,932/- कोटी रुपये |
| ग्रामविकास | 11,480/- कोटी रुपये |
| नगर विकास | 10,629/- कोटी रुपये |
| कृषी | 9,710/- कोटी रुपये |
| नियोजन | 9,060.45 कोटी रुपये |
| इतर मागास बहुजन कल्याण | 4,368/- कोटी रुपये |
| मृदा व जलसंधारण विभाग | 4,247/- कोटी रुपये |
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !