महाराष्ट्र अर्थसंल्पातील काही महत्वपुर्ण बाबी ; या कामासाठी विशेष निधीची तरतुद !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important matters in Maharashtra’s economic crisis; Provision of special funds for this work.. ] : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असुन , काल दिनांक 10.03.2025 रोजी राज्याचे वित्त मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये काही विशिष बाबीसाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .

स्टीब हब : जिल्हा गडचिरोली येथे स्टील हब तयार करण्यासाठी या जिल्हामध्ये खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करणे कामी रुपये 500/- कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र : राज्यात वांद्रे -कुर्ला , वडाळा , गोरेगाव , कुर्ला – वरळी , नवी मुंबई , खारखर , विरार बोईसर अशा 07 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत .

  • सामुहिक प्रोत्साहन योजना अंतर्गत रुपये 6,400/- कोटी इतका निधी अनुदान मंजूर करण्यास मान्यता .
  • लाडकी बहीण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करीता महिला व बाल विकास योजनासाठी तब्बल 31,907 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली .
  • उर्जा विभागास 21,534 कोटी रुपयाची तरतुद .

उर्वरित प्रमुख विभाग व विभाग निहाय अर्थसंकल्पीत निधी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .

विभागाचे नावअर्थसंकल्पीत निधी
सार्वजनिक बांधकाम ( रस्ते ) – सार्वजनिक उपक्रम वगळून19,079 कोटी रुपये
जलसंपदा15,932/- कोटी रुपये
ग्रामविकास11,480/- कोटी रुपये
नगर विकास10,629/- कोटी रुपये
कृषी9,710/- कोटी रुपये
नियोजन9,060.45 कोटी रुपये
इतर मागास बहुजन कल्याण4,368/- कोटी रुपये
मृदा व जलसंधारण विभाग4,247/- कोटी रुपये

Leave a Comment