@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sevantrigat ashvasan Pragati Yojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने , असलेली कुंठीतता घालवण्यासाठी संबंधित पदधारकांना बारा वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून कृषी…
विद्यापीठे व उच्च व तंत्र शिक्षण विभागाला मान्यता दिल्याप्रमाणे दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत अश्वाषित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे .याशिवाय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना..
वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2010 तसेच दिनांक 05 जुलै 2010 याशिवाय दिनांक 06 सप्टेंबर 2014 मधील सर्व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहे .याशिवाय सदरील सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत येणारा खर्च हा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून मागविण्यात यावा .
तथापि सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ अदा करण्यापूर्वी आवश्यक त्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा , तसेच सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेणे आवश्यक असेल असे सदर शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !