न्यायालयीन गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा GR ; इतर विभागापेक्षा मोठी वेतनश्रेणीत मोठी वाढ !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revision in the pay scale of officers/employees in Judicial Group A to Group D cadre GR ] : उच्‍च न्यायालय , मुंबई खंडपीठ , नागपुर खंडपीठ , औरंगाबाद खंडपीठ येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत विधी व न्याय विभागांकडून दिनांक 11.01.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , उच्‍च न्यायालय मुंबई , खंडपी नागपुर व औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे . याबाबत सदर निर्णयात पदनाम सातवा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी व सुधारित वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेली आहे .

सदर न्यायालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सदर शासन निर्णयानुसार सुधारित वेतनश्रेणी पाहिल्या असता , इतर विभागापेक्षा सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे . सदर वेतनश्रेणीतील वाढ ही कामाच्या स्वरुपानुसार करण्यात आले आहे .

कारण न्यायालयांमध्ये अधिकारी /कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काम असते , परिणामी वेतनांमध्ये देखिल सुधारणा करण्यात आलेली आहे .पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment