आता राज्य सरकारच्या आपले सरकारच्या 500 सेवा ह्या व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन मिळणार !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now 500 state government services will be available through WhatsApp. ] :  राज्य सरकारच्या आपले सरकारच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सेवेतील 500 सेवा ह्या आता व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन नागरिकांना दिल्या जाणार आहेत , या बाबत राज्य सरकारकडून अधिकृत सुचना देण्यात आलेल्या आहेत .

याकरीता बीकेसी येथे टेक वीक 2025 चा शुभारंभ करण्यात आले आहेत , तर मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील 500 पेक्षा अधिक सेवा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . तसेच नव्या सुविधामुळे राज्यात व्हॉट्सॲप गर्व्हर्नन्स चा नवा अध्याय सुरु होणार आहे , तसेच नागरिकांना अधिक सोयिस्कर तसेच जलद पद्धतीने सेवा मिळणार आहेत .

तसेच फिनटेक व एआय क्षेत्रातील स्टार्टअपला गती देणे करीता सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत .तसेच याकरीता MMRDA व नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यांमध्ये सामंजस्य करार झाला आहे . तसेच आपले सरकार व्हॉट्सॲप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग व मेटा यांच्यामध्ये देखिल करार झाला आहे .

या दृष्टीने पुढील 05 वर्षे मध्ये राज्यात सरकार वाढवण बंदर , नवी मुंबई – आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणी त्याचबरोबर वैनगंगा व गोदावरी नदीजोड या मोठ्या पायाभुत सुविधा प्रकल्प यांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत .

तसेच राज्यातील सायबर सुरक्षा बळकळ करण्यासाठी आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र स्थापित केले जाणार आहे , तसेच मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्याने नवी मंबई , ठाणे , व वाढवण येथे नविन शहरे उभारली जाणार आहेत .

Leave a Comment