@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding the implementation of promotion/senior pay scale to these employees along with incentive allowance and HRA along with single pay scheme ] : आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन , एकस्तर वेतन योजनेसह , प्रोत्साहन भत्ता व घरभाडे भत्ता अदा करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 18.02.2025 रोजी आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
श्री.भरत पटेल , अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक , शिक्षकेत्तर संघटना , महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत आदिवासी विकास विभाग नाशिक या कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले होते , त्या अनुषंगाने सदरचे परिपत्रक आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आले आहेत .
या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , श्री.भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक , शिक्षकेत्तर संघटना , महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन एकस्तर वेतन योजनासह , प्रोत्साहन भत्ता व घरभाडे भत्ता अदा करणेबाबत तसेच ..
अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकरी / सुरक्षारक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणेबाबत , आयुक्तालयात निवेदन / पत्र सादर केले आहेत . सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी नियमोचित कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !