@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New education policy implemented; Education structure is 5+3+3+4, 10th board canceled, degree is 4 years, know the detailed policy ] : नविन शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आलेली असून , हे नविन धोरण यंदाच्या ( सन 2025-26 ) शैक्षणिक वर्षांपासुन लागु होणार आहे .
शिक्षणाची रचना : शिक्षणांची रचना ही 5+3+3+4 अशी असणार आहे . यांमध्ये पहिले पाच वर्षे हे पायाभुत शिक्षण यांमध्ये नर्सरी , कनिष्ठ केजी , वरिष्ठ केजी व इयत्ता पहिली व दुसरीचा समावेश असणार आहे .
पुढील 03 वर्षे हे शिक्षणाच्या पुर्वतयारीचे असणार आहेत , यांमध्ये इयत्ता तिसरी , चौथी व इयत्ता पाचवीचा समावेश असणार आहे . तर त्यापुढील 03 वर्षे हे माध्यमिक शिक्षणांचे असणार आहेत , यांमध्ये सहावी , सातवी व आठवीचा समावेश असेल .
तर पुढील 04 वर्षे हे उच्च माध्यमिक शिक्षणाचे असणार आहेत . यांमध्ये इयत्ता 09 वी , 10 वी , इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी चा समावेश असणार आहे . अशा प्रकारे शिक्षणांची रचना असणार आहे .
प्रमुख वैशिष्ट्ये : नविन शैक्षणिक धोरणानुसार आता केवळ इयत्ता 12 वी मध्येच बोर्ड परीक्षा असणार आहे , तर इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा ही अनिवार्य असणार नाही . तर एमफिल देखिल रद्द करण्यात आले आहेत .
तर महाविद्यालयीन पदवी ही 04 वर्षाची करण्यात आलेली आहे , यांमध्ये पहिल्या वर्षानंतर प्रमाणपत्र दिले जातील , दुसऱ्या वर्षी डिप्लोमा तर तिसऱ्या वर्षी पदवी प्रमाणपत्र तर चौथी वर्षी थेट पदव्युत्तर पदवी करु शकणार आहेत .
इंग्रजी भाषेचे महत्व कमी : यापुढे इंग्रजी भाषा केवळ विषय म्हणूनच शिकवला जाईल , तर इयत्ता 5 वी पर्यंतचा अभ्यास हा मातृभाषा / स्थानिक भाषा , राष्ट्रीय भाषेतच शिकविण्यात येईल .
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !