@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Very important GR issued by the Finance Department regarding extension of tenure of temporary posts in State Government Services ] : राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदवाढ देणे संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 03.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट करण्यात आलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही , अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 03.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत .
सदरच्या कालावधीमध्ये , सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवारी व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेवून , सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे .
यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही . याची सर्व विभागांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या ( खुद्द ) आस्थापनेवारील पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करुन त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या निर्णयामुळे अस्थायी पदांना दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभागांना प्राप्त झाले आहेत .


आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025