आंतरजिल्हा बदली 2024-25 बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised schedule for inter-district transfer 2024-25 ] : आंतरजिल्हा बदली सन 2024-25 बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत  , सदर वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व मे.विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनांच्या दिनांक 23.05.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , निश्चित करण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन 2024-25 राबविण्याकरीता निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार , शिक्षकांची माहिती ही पेार्टलवर अद्ययावत करण्याचे अंतिम दिनांक ही 10 मार्च अशी असेल . तर जिल्हा परिषदांनी बिंदुनामावल्या तपासून घेणे , पोर्टलवर बिंदुनामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करण्याचा कालावधी हा दिनांक 11.03.2025 ते दि.13.03.2025 असा असेल .

तसेच शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे , अर्जांची पडताळणी करण्यासाठी दिनांक 21 मार्च ते दिनांक 25 मार्च 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे .

तसेच न्यायालयीन प्रकरणे / विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास , या प्रकरणी प्रथमत : तपासुन प्राधान्य देणे , व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण करण्याचा अंतिम दिनांक हि दिनांक 06.04.2025 अशी असणार आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment