@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding promotion of teachers to NET / SET qualified candidates issued on 25.02.2025 ] : नेट / सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देणे बाबत , विधानपरिषद तारांकित प्रश्न क्र.1860 नुसार राज्यातील जिल्हा परिषदांमधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देणेबाबत , श्री.सत्यजित तांबे मा.वि.प.स यांनी प्रश्न उपस्थित केला होता .
यानुसार ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 25.02.2025 रोजी ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 25.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील जिल्हा परिषदांमधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देणेबाबत , श्री.सत्यजित तांबे मा.वि.प.स यांनी तारांकित प्रश्न क्र.1860 उपस्थित केला आहे .
सदरचा प्रश्न हा स्वीकृत असून याबाबत , उप-आयुक्त ( आस्थापना ) विभागीय आयुक्त कार्यालय ( सर्व ) यांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व प्रश्न भाग निहाय उत्तर पुरक टिप्पणीसह शासनांस तात्काळ उलट टपाली सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे .
त्याचबरोबर सदर प्रश्न संदर्भात विस्तार अधिकारी ( शिक्षण ) व केंद्रप्रमुख या पदांबाबतची विभाग निहाय एकत्रित माहिती विहीत विवरण पत्रात भरुन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये नियुक्तीचा प्रकार , मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीने व पदोन्नती निवड या बाबींची माहिती मागविण्यात आलेली आहे .


आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !