अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

माहे नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीत अवेळी पाऊस यामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देणेकरीता एकुण 429.30 लक्ष इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे .

चालु हंगामामध्ये यापुर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरीता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये सदर प्रस्तांवा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे विहीत दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच महसुल विभागाच्या दिनांक 01.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिरायत पिके , बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहीत दरानुसार जास्तीत जास्त 03 हेक्टरच मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत .

सदरचा निधी हा कोकण व नाशिक विभागातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक , धुळे , जळगाव या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे .या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment