@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government imposes strict rules on government employees’ use of social media ] : सोशल मिडीया वापराबाबत , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवार रोजी विधान परिषदेत माहिती दिली आहे .
राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सोशल मिडीया ( व्हाट्सॲप , फेसबुक , इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत , राज्य शासनांकडून लवकरच अधिकृत्त मार्गदर्शक तत्वे तयार करुन शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती मा.मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणुक नियम 1979 अंतर्गत सोशल मिडीया वापराबाबत नियमावली नमुद नसल्याने , सदर सेवा वर्तवणुक नियमांमध्ये बदल करण्यात येणार अहोत . सदर बदल हा सध्याच्या काळात वाढत्या सोशल मिडीयाचा प्रभाव लक्षात घेवून बदल केला जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा :मुंबई न्यायालयांमध्ये सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
यांमध्ये सरकारी कर्मचारी आपल्या दैनंदिन आयुष्यात सोशल मिडीयाचा वापर करुन शासकीय धोरण / योजना यावर टिका / टिपणी करणे , चुकीचे बाब असल्याचे नमुद आहेत . सदरचा निर्णय हा लोकहितासाठी घेण्यात येणार आहे .
यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीया वापरावर आंकुश येणार आहे . तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीयाचा वापर हा जनतेशी संवाद व सार्वजनिक हिताकरीता करावा असे आव्हान मा.मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आले आहेत .
- आज दिनांक 29 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
- जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025
- अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणापत्र देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !