@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now 500 state government services will be available through WhatsApp. ] : राज्य सरकारच्या आपले सरकारच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सेवेतील 500 सेवा ह्या आता व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन नागरिकांना दिल्या जाणार आहेत , या बाबत राज्य सरकारकडून अधिकृत सुचना देण्यात आलेल्या आहेत .
याकरीता बीकेसी येथे टेक वीक 2025 चा शुभारंभ करण्यात आले आहेत , तर मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील 500 पेक्षा अधिक सेवा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . तसेच नव्या सुविधामुळे राज्यात व्हॉट्सॲप गर्व्हर्नन्स चा नवा अध्याय सुरु होणार आहे , तसेच नागरिकांना अधिक सोयिस्कर तसेच जलद पद्धतीने सेवा मिळणार आहेत .
तसेच फिनटेक व एआय क्षेत्रातील स्टार्टअपला गती देणे करीता सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत .तसेच याकरीता MMRDA व नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यांमध्ये सामंजस्य करार झाला आहे . तसेच आपले सरकार व्हॉट्सॲप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग व मेटा यांच्यामध्ये देखिल करार झाला आहे .
या दृष्टीने पुढील 05 वर्षे मध्ये राज्यात सरकार वाढवण बंदर , नवी मुंबई – आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणी त्याचबरोबर वैनगंगा व गोदावरी नदीजोड या मोठ्या पायाभुत सुविधा प्रकल्प यांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत .
तसेच राज्यातील सायबर सुरक्षा बळकळ करण्यासाठी आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र स्थापित केले जाणार आहे , तसेच मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्याने नवी मंबई , ठाणे , व वाढवण येथे नविन शहरे उभारली जाणार आहेत .

- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !