दि.06 मार्चला राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन ; “या” आहेत प्रमुख मागण्या !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees to hold state-wide sit-in protest on March 6; These are the main demands ] : दिनांक 06 मार्च 2025 रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहेत .

सदर धरणे आंदोलन हे सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहेत . सदर धरणे आंदोलन हे राज्यव्यापी असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळ सत्रात 02 तास कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत .

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबींवर राज्य सरकारकडून उदासिनता दिसून येत असल्याने , सदर धरणे आयोजित करण्यात येत आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावेत .

तसेच PFRDA चा कायदा रद्द करण्यात यावा , फंड मॅनेजर कडे संचित करण्यात आलेली रक्कम ही संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी , तसेच EPS – 95 नुसार असणाऱ्या वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन संबंधित राज्य सरकारला परत करण्याची मागणी , कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात यावेत .

  • आठवा वेतन आयोग वेतनस्तर बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा .
  • राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करण्यात यावेत .
  • कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कॅशलेश उपचार मिळणे करता , सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी .
  • जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी , वाहनचालक पदावरील पदभरती बंदी तात्काळ उठविण्यात यावी .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment