@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Letter of representation regarding increase in incentive allowance to Class IV employees ] : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्यात वाढ करणेबाबत , चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनाच्या वतीने प्रशासनास निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत .
सदर निवेदन पत्रानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रांमध्ये वर्ग – 4 कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
आदिवासी भागांमध्ये वास्तव्य करण्यास व तिथे काम करण्यास कर्मचाऱ्यांनी प्रेरित व्हावेत , यासाठी शासनांने दिनांक 01 जानेवारी 1989 पासुन दरमहा विशिष्ट दराने प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याची योजना सुरु केली आहे . यांमध्ये वेळोवेळी सुधारणा देखिल करण्यात आलेली आहे .
प्रोत्साहन भत्ता हा नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मुळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान 200/- रुपये व कमाल 1500/- रुपये दरमहा या मर्यादेत अनुज्ञेय ठरविण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अति संवेदनशील आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो , तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरण मुंबई , खंडपीठ नागपुर यांचे न्यायालय निकालात सुद्धा दिनांक 02 सप्टेंबर 2024 नुसार शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 06.08.2002 नुसार मुळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान 200/- व कमाल 1500/- च्या मर्यादेत प्रोत्साहन देय राहील असे नमुद आहे .
सदर संदर्भानुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !