वेतनत्रुटी निवारण समिती अहवाल ; मंजुरी व सुधारित वेतनश्रेणी कधीपासुन लागु होणार ?

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vetantruti nivaran samiti ] : सातवा वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याच्या अनुषंगाने वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली होती .

सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला असून , सदर अहवालास कधी मंजूरी मिळणार व कधीपासुन राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रणीचा लाभ मिळेला असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे . कारण लवकरच आठवा वेतन आयोग लागु होणार असल्याने सातवा वेतन आयोगातील त्रुटी दुर होणे आवश्यक आहेत .

सुधारित वेतनश्रेणी कधीपासुन लागु होणार ? : सदर वेतनत्रुटी निवारण समितीला अद्याप राज्य शासनांची मंजुरी मिळालेली नाही , तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या वर्षाचे आर्थिक बजेट लक्षात घेवून सदर अहवालास मंजूरी दिली जाईल , अशी शक्यता आहे .

वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज पुर्ण झाले असल्याने , सदर अहवाल राज्य शासनांच्या वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे . सदर विभागांकडून मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठवला जाईल . व मंजूरीनंतरच सुधारित वेतनश्रेणीचा अधिकृत शासन निर्णय / अधिसुचना निर्गमित केली जाईल .

याकरीता राज्य कर्मचाऱ्यांना आणखीण 2-3 महिन्यांचा अवधी लागण्याची संभावना आहे .

Leave a Comment