@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding employees accepting resignation from government service ] : शासकीय अधिकाारी / कर्मचारी यांचा शासकीय सेवेतील राजीनामा स्वीकारणे संदर्भात सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 02.12.1997 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा सक्षम प्राधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याची पोच पावती घ्यावा . तसेच राजीनामा स्पष्ट व विनाशर्त असावा . त्यांमध्ये कुठल्याही अटी / शर्तींचा समावेश असल्यास त्या दुर्लक्षित समजण्यात येतील .
तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनाम्याच्या अर्जांमध्ये संबंधित अधिकाऱ्याचा / कर्मचाऱ्याचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे . याची खातरजमा करुन घेण्याचे नमुद करण्यात आले आहेत .त्याचबरोबर स्थायी / अस्थायी शासकीय अधिकरी / कर्मचाऱ्यास त्याच्या पदाचा राजीनामा देण्यासंबंधी एक महिन्याची पुर्वसुचना अथवा पुर्वसूचनेऐवजी त्यांकडून एक महिन्याचे वेतन वसूल करण्या संबंधी अट नियुक्ती आदेशातच घालण्यात यावी .
तथापि हा कालावधी 30 दिवसांपेक्षा कमी करावयाचा असल्यास , तशी कार्यवाही का करण्यात येत आहे , याबाबतच्या कारणांचा अंतर्भाव सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी राजीनामा स्वीकृतीच्या आदेशात करणे आवश्यक राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच राजीनामा स्वीकारण्यापुर्वी कराराच्या अथवा बंधपत्राच्या अटी विचारात घेण्यात याव्यात तसेच करारानुसार राजीनामा स्वीकृती संदर्भात पुर्वसुचना देण्यासाठी विहीत करण्यात आलेला कालावधी 01 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर सदरहू कालावधी समाप्त होईपर्यंत राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय रोखून ठेवण्यात यावा व तसे संबंधित अधिकाऱ्याला / कर्मचाऱ्याला एक महिन्याची मुदत संपण्यापुर्वी कळविण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे देय पेन्शनसह इतर आर्थिक थकबाकी तातडीने अदा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश !
- पदोन्नती नंतर वेतनिश्चिती करताना वाढीव वेतनवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय !
- सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपविण्याच्या तयारीचे विधेयक मंजूर ; जाणून घ्या सविस्तर !
- 14 एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त केलेल्या 32 पदवी व त्यांना ज्ञात असणाऱ्या 12 भाषांची यादी जाणून घ्या सविस्तर !
- निर्धन रुग्ण व गरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार ; सरकारच्या धर्मदाय योजना बाबत जाणून घ्या सविस्तर !