@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of house rent allowance difference to employees ] : कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) फरक देणेबाबत , शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 03.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमि करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक ( सर्व ) यांच्या प्रति श्री.अनिक बोरनारे संयाजक मुंबई व कोकण विभाग शिक्षक आघाडी , भाजप यांच्या निवेदन पत्राच्या संदर्भाधिन पत्रानुसार सादर करण्यात आलेला आहे .
सदर पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे जुलै 2021 पासुन राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळा मध्ये कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देय घरभाडे भत्यात वाढ करण्यात आली आहे . सदरची वाढ ही 24 टक्के वरुन 27 टक्के अशी करण्यात आली आहे .
माहे ऑक्टोंबर 2021 पासुन प्रत्यक्ष 27 टक्के वाढ प्रमाणे वाढ देण्यात आलेली आहे , मात्र माहे जुलै 2021 पासुन ते माहे सप्टेंबर 2021 या कालावधीमधील थकबाकी इतर सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे . परंतु शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध नसल्याने सदर शिक्षकांना सदर कालावधीमधील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही .
हे पण वाचा : अधिकारी , कॅशियन , लिपिक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती !
यासाठी थकीत देयकांचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 नुसार सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक असून , सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !