@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision of the Finance Department for employees who joined the state government service after 01.11.2005 ] : महाराष्ट्र शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 अथवा त्यानंतर रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 09.05.2022 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार जर दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र शासन सेवेत रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल , अशांना परत शासन सेवेत येण्याची संमती दर्शविल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताचा विचार करुन सदर व्यक्तीस परत शासन सेवेत घेण्यासाठी सदर निर्णयातील नमुद अटी / शर्तींच्या अधीन राहून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत .
अटी व शर्तीमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जर कर्मचाऱ्यांने इतर खाजगी अथवा महामंडळे , शासनांच्या मालकीची कंपनी / संस्था अथवा शासनांकडून अर्थसहाय्य दिले जाणारी संस्था मध्ये नेमणूक होण्यासाठी शासन सेवेतील जाहीरानामा दिला असेल तर अशा प्रकरणी सदर व्यक्तीस पुन्हा शासन सेवेत घेण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .
याशिवाय जर कर्मचाऱ्यांने राजीनामा दिला असेल तर , त्या जागी अथवा अन्य कोणतेही तुलनिय पदे उपलब्ध असणे आवश्यक असेल . जर राजीनामा मागे घेवून सदर व्यक्ती रुजु होण्याचे आदेश दिल्यापासून 90 दिवसांच्या आता हजर होणे आवश्यक असेल .
सदर बाब ही अस्थायी कर्मचाऱ्यांना लागु होणार नाही , याशिवाय कर्मचाऱ्याची सचोटी / कार्यक्षमता / वर्तवणूक या व्यतिरिक्त अन्य कारणास्तव राजीनामा दिला असेल तर राजिनामा परत घेता येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
सदरचा निर्णय हा राज्यातील कृषीत्तरे विद्यापीठे , अनुदानित शैक्षणिक संस्था तसेच अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांना देखिल योग्य त्या फेरफारांस लागु होणार आहेत , असे नमदु करण्यात आले आहेत . या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !