@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .
01.घरबांधणी अग्रिम : शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – घरबांधणी अग्रिमे , अनिवार्य या लेखाशिर्षाखाली सन 2024-25 या वित्तीय वर्ष करीता मंजुर असणाऱ्या अनुदानातुन शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम करीता अनुदानाचे वाटप करण्यात आले आहेत . सदर संपुर्ण अग्रिमाची व्याजासह वसूली होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावे असे नमुद करण्यात आले आहेत .
अर्जदार कर्मचाऱ्याचे घराचे बांधकाम विहीत टप्यापर्यंत पुर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतर दुसरा व तिसरा टप्यासाठी अनुदानाच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे नमुद करण्यात आले आहेत . तर ज्या अर्जदारांना तिसरा हप्ता / अंतिम हप्ता प्रमाणित करण्यात आला आहे . त्या अर्जदारांकडून नियमानुसार आवश्यक त्या संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन घेवून नंतरच प्रत्यक्ष रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहे .
जमीन खरेदी करुन घर बांधणे या प्रयोजन करीता अग्रिमाचा पहिला हप्ता मंजूर केल्याच्या नंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापुर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आराखडे , गहाण खताची प्रत अभिलेखात जतन करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
02.मोटार वाहन खरेदी अग्रिम : मोटार वाहन खरेदी करीता अग्रिम विधी व न्याय विभागांकडून दिनांक 17.03.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुर करण्यात आला आहे . मोटार वाहन अग्रिम हा अधिकाऱ्यांस त्यांच्या सेवा कालावधीत एकदाच देय असणार आहे . तसेच प्रमाणित करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग विहीत कालावधीत न झाल्यास , प्रमाणित करण्यात आलेली रक्कम त्वरीत शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्यात विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
नविन मोटार कार खरेदी करीता मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसूली करताना प्रथमत: मुद्दलाची 100 समान मासिक हप्त्यात वसूली करण्यात यावी व त्यानंतर व्याजाची वसुली 40 समान मासिक हप्यात करण्यात यावी , मात्र एखादा अधिकारी नियत वयोमानानुसार मासिक हप्प्याचे 140 महिने पुर्ण होईपुर्वीच सेवानिवृत्त होणार असेल , तर त्याच्या सेवानिवृत्तीपुर्वी संपुर्ण अग्रिमाची व्याजासह वसूली होईल अशा प्रकारे वसूलीचे हप्ते निश्चित करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत . या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !