आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांना राज्य शासनांच्या दिनांक 30 एप्रिल 1984 रोजीच्या शासन निर्णयानुसार 02 आगाऊ वेतनवाढी अनुज्ञेय करण्यात येत होत्या तर सहावा वेतन आयोग राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01.04.2009 च्या शासन निर्णयानुसार लागु झाला आहे .

तर सहावा वेतन आयोग लागू केल्याच्या नंतर त्यामधील तरतुदीनुसार आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना लागु करण्यात आलेली नाही , तर शिक्षकांना सहावा वेतन आयोग दिनांक 12 जुन 2009 च्या निर्णयानुसार लागु करण्यात आला आहे . तर मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 04.09.2014 पुर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 02 आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .

हे पण वाचा : कर्मचारी सेवानिवृत्ती वयामध्ये बदल करणे बाबत , महत्वपूर्ण अपडेट !

यानुसार राज्य पुरस्कार प्राप्त दिनांक 07.02.2014 च्या शासन निर्णयानुसार 27 शिक्षक तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दिनांक 09.08.2014 रोजीच्या शासन परिपत्रकातील 08 शिक्षक तर सन 2014 च्या आदेशातील 02 शिक्षक असे 35 पात्र शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तर दिनांक 04.09.2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ 02 वेतनवाढी ऐवजी अदा करण्यात आलेली 1,00,000/ रुपये ठोक रक्कम वजा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment