“या” कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision regarding revision in the pay scale of these employees issued on 20.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 20 मार्च 2025 रोजी महत्वहपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.उच्च न्यायालय , मुंबई , खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ व गट ब कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबतच्या दिनांक 19 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई , खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ व गट ब कर्मचाऱ्यांची दिनांक 01 जानेवारी 2016 रोजीच्या वेतननिश्चितीमध्ये सुधारणा करणे समाविष्ट करण्यात आलेले आहेत .

यानुसार दिनांक 01 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी रुपये 49100/- ( सेल 1 , लेव्हल – एस -18 ) इतके निश्चित करण्यात आले असेल , त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही व सदर मॅट्रिक्सच्या किमान वेतनावर वेतन निश्चित केले जाईल .

हे पण वाचा : केंद्रीय कर्मचारी महासंघाने सरकारकडे मांडल्या “या” प्रमुख 4 मागण्या ; मागण्या पुर्ण होण्याची अपेक्षा !

तसेच दिनांक 01 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2003 दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी रुपये 49100/- ( सेल – 1 , लेव्हल एस – 18 ) इतके निश्चित करण्यात आले असेल . त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन 50600/- ( सेल 2 , स्तर एस – 18 ) इतके निश्चित करण्यात केले जाईल .

त्याचबरोबर दिनांक 01 जानेवारी 1998 ते दिनांक 31 डिसेंबर 2000 दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी रुपये 49100/- ( सेल -1 , लेव्हल एस – 18 ) इतके निश्चित करण्यात आले असेल , त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये दोन अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये 52,100/- ( सेल – 3 , स्तर एस – 18 ) इतके निश्चित करण्यात येतील .

तसेच दिनांक 31 डिसेंबर 1997 पुर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी 49100/-  ( सेल 1 , लेव्हल एस – 18 ) इतके निश्चित करण्यात आले असेल . त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये तीन अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन 53,700/- ( सेल 4 , एस – 18 ) निश्चित केले जाईल .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment