@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision finally issued on 20.03.2025 regarding payment of arrears by implementing equal pay for equal work ] : समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत , अखेर कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 20 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , मा.उच्च न्यायालय मुंबई , खंडपीठ नागपुर निर्णयानुसार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील याचिका कर्त्या रोजंदारी मजुरांना कायम कामगरांच्या वेतनाच्या 1/30 दराने रोजंदारी फरकाची रक्कम देण्यासाठी कुलसचिव , डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ..
अकोला यांनी मागणी केल्यानुसार , रुपये 9.77 कोटी इक्या रकमेतुन शासन निर्णय दिनांक 23.10.2020 रोजी देण्यात आलेल्या रुपये 2.60 कोटी इतक्या निधी व्यतिरिक्त उर्वरित 7.17 कोटी इतका निधी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
सदर प्रकरणी रोजंदारी मजुरांना समान काम समान वेतनानुसार देय असलेल्या रकमेची योग्य पडताळणी करुन देय फरकाची रक्कम ही पात्र याचिका कर्त्यांनाच देण्यात यावी , याबाबत संपुर्ण जबाबदारी ही विद्यापीठ स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांची असेल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच पात्र याचिका कर्त्यांना थकबाकी देण्याकरीता ग्राह्य कालावधी, थकबाकीची देण्यात आलेली रक्कम इ.बाबतचा याचिकाकर्ता तपशिल निहाय अहवाल शासनास कृषी विद्यापीठ स्तरावरुन सादर करण्यात यावा तसेच सदर निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .


- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !