@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding payment of salary subsidy for employees for the month of February 2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेड इन मे महिन्यातील वेतन अदा करण्याकरीता अनुदान वितरीत करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 05.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेली व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .
सदरचा निधी हा परिभाषित अंशदान निवृत्ती योजना , मान्यताप्राप्त शाळांच्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनावरील व्याज तसेच सर्वसाधारण शिक्षण , क्रिडा व युवक सेवा या लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयामधील अटी / सुचना व मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट – 26 मधील तरतुदी विचारात घेवून किमान रक्कमेच्या मर्यादेत घरबांधणी अग्रीम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .
तसेच दिनांक 01.05.2001 रोजी अथवा त्यानंतर 02 पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही , असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनांस 10 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (GR)
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !