@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ teacher / non teaching employee dharanadhikar shasan nirnay ] : अकृषी विद्यापीठे , अनुदानित / विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या धारणाधिकाराबाबत , एकसुत्रता असावी त्याचबरोबर धारणाधिकाराच्या कालावधीत धारणाधिकार प्राप्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदावर कोणत्या स्वरुपात नियुक्ती करावी ..
या संदर्भातील सुचना दिनांक 23.08.2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत . सदर निर्णयातील मुद्दा क्र.03 नुसार अधिकतम 02 वर्षांसाठी धारणाधिकार मंजूर करता येतो . तसेच विद्यापीठ कायाद्यातील वैधानिक पदांवर नियुक्ती झाल्यास , अधिकतम 05 वर्षांसाठी धारणाधिक मंजूर करण्यात येतो .
वैधानिक पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नियम वयोमानाने सेवानिवृत्त होण्याचा सेवा कालावधी 05 वर्षांपेक्षा अधिक असल्यास , त्यांच्या धारणाधिकाराबाबत , समस्या निर्माण होऊ शकते , त्यामुळे धारणाधिकाराच्या कालमर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
अकृषी विद्यापीठे , अनुदानित / विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची , विद्यापीठ कायद्यातील वैधानिक पदावर नियुक्ती झाल्यास , त्यांना दिनांक 23.08.2010 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.03 नुसार 05 वर्षे इतक्या कालावधीतील धारणाधिकार मंजूर करण्यात येतो , त्यात सुधारणा करुन सदर धारण अधिकाराचा कालावधी हा 10 वर्षे इतका करण्यात येत आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !
- राज्यातील सर्व शाळांचे नविन अभ्यासक्रमानुसार कामाचे दिवस , विषय निहाय तासिक व सुधारित वेळापत्रक जाहीर !
- शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत , शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित दि.17.06.2025
- SGSP : भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती !