@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ Firing Outside House of Salman Khan News ] : सलमान खानच्या घराबाहेर काल दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4.51 मिनिटांनी गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे . या घटनेची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे .
सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवास स्थानाबाहेर काल रविवारी दोन अज्ञातांनी दुचाकीवरुन पहाटे 4.51 मिनिटांनी गॅलेक्सी अपार्टमेंटवर सहा ( 06 ) गोळ्या झाडल्या . या घटनेची कसून तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे . तर या घटनेची संपुर्ण जबाबदारी बिश्नोई गँगचे अनमोल बिश्नाई यांच्या नावाने फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे .
बिश्नाई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नाई हा सध्या तुरुंगात आहे , तर त्यांचा भाऊ अनमोल बिश्नाई यांनी सदर पोस्ट टाकली असल्याची माहिती सांगितली जात आहे . या व्हायरल पोस्टमुळे या गोळीबारी झालेल्या घटनेचे मुळ शोधणे पोलिसांना अधिक कठीण होणार आहे .
सलमान व लॉरेन्स यांचे वैर का झाले ? सलमान खानने सन 1998 मध्ये राजस्थान राज्यात हम साथ साथ है या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान काळवीटाची हत्या केली होती , बिश्नोई समाजामध्ये काळ्या हरणांना पवित्र समजले जाते , व त्यांची पुजा देखिल केली जाते . यामुळे सलमान खानवर काळवीटाची हत्या केल्याच्या आरोप झाल्यापासून सलमान खानशी लॉरेन्स बिश्नोईचे वैर झाले आहे .
लॉरेन्स बिश्नोई या पुर्वी देखिल सलमान खानला अनेक वेळा धमक्या दिलेले आहे . हे सर्व झाले असले तरी , सलमान खानच्या घरावर गोळीबार कोणी केले , याबाबत पोलिस प्रशासनांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही , पोलिस यंत्रणांकडून तपास करुन माहिती प्रसिद्ध करण्यात येईल .