सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये इ.पहिली तसेच नर्सरी , ज्युनिअर / सिनिअर केजी करता मुलांचे किमान / कमाल वयोमर्यादा बाबत सविस्तर माहिती ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्या पाल्यांस जर आगामी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये नर्सरी / प्ले ग्रुप , ज्युनिअर केजी , सिनीयर केजी साठी प्रवेश घ्यायचे असल्यास , राज्य शासनांकडून वयोमर्यादा बाबत नमुद करण्यात आलेले चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता .

दर वर्षी राज्य शासनांकडून विद्यार्थ्यांचे इयत्ता 1 ली , ज्युनिअर केजी / सिनिअर केजी प्रवेशाकरीता वयांचे किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित केली जाते , पुढील वर्षाकरीता राज्य शासनांकडून विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेले आहेत . सदर निश्चित वयोमर्यादा नुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील .

नर्सरी / प्ले ग्रुप साठी प्रवेश घेण्यासाठी दिनांक मुलाचे जन्म हे दिनांक 01 जुलै 2020 ते दिनांक 31 डिसेंबर 2021 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये किमान वय हे 03 वर्षे तर कमाल वय हे 4 वर्षे 5 महिने व 30 दिवस इतके असतील . तर ज्युनिअर केजी करीता मुलाचे जन्म हे दिनांक 01 जुलै 2019 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 दरम्यान असणे आवश्यक असेल .यांमध्ये मुलाचे किमान वय हे 4 वर्षे तर कमाल वय हे 5 वर्षे 5 महिने व 30 दिवस इतके असणे आवश्यक असेल .

तर सिनिअर केजी प्रवेशाकरीता मुलाचे जन्म हे दिनांक 01 जुलै 2019 ते दिनांक 31 डिसेंबर 2019 दरम्यान असणे आवश्यक असेल , तर किमान वय हे 5 वर्षे तर कमाल वय हे 6 वर्षे 5 महिने व 30 दिवस इतके असतील .

इयत्ता पहीली करीता वयोमर्यादा : इयत्ता पहिलीच्या प्रवेशाकरीता मुलाचे जन्म हे दिनांक 1 जुलै 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 दरम्यान झाला असणे आवश्यक असेल , तर किमान य हे 6 वर्षे तर कमाल वय हे 7 वर्षे 5 महिने व 30 दिवस इतके असणे आवश्यक असेल .

शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश करीता वयोमर्यादा व जन्म दिनांक तक्ता :

अ.क्रप्रवेश वर्गकिमान वयकमाल वयजन्म दिनांक कालावधी
01.प्ले ग्रुप / नर्सरी3 वर्षे4 वर्षे 5 महिने 30 दिवसदि.01.07.2020 ते 31.12.2021
02.ज्युनिअर केजी4 वर्षे5 वर्षे 5 महिने 30 दिवसदि.01.07.2019 ते दि.31.12.2020
03.सिनिअर केजी5 वर्षे6 वर्षे 5 महिने 30 दिवसदि.01.07.2019 ते दि.31.12.2019
04.इ.1 ली6 वर्षे7 वर्षे 5 महिने 30 दिवसदि.01.07.2017 ते दि.31.12.2018

Leave a Comment