@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकिर्दीत एकुण 32 पदव्या प्राप्त केले होते . त्या कोणत्या पदव्या होत्या याबाबत आपणांस माहिती असणे आवश्यक आहे , कारण आजच्या काळांमध्ये ऐवढ्या पदव्या मिळविणे कोणालाही सहज शक्य होत नाही .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास 27 वर्षांचा होता , यांमध्ये त्यांनी तब्बल 32 पदव्या मिळवले होते .यांमध्ये सन 2012 मध्ये बी.ए , सन 1915 मध्ये डबल एम.ए तर 1917 मध्ये पी.एचडी तर सन 2021 मध्ये एम.एसस्सी .तर 1922 मध्ये बार ॲक्ट लॉ इत सन 1923 मध्ये डी.एस्सी तर सन 1952 मध्ये एल.एल डी पदवी तर सन 1953 मध्ये डी.लिट अशा महत्वाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना एकुण 11 भाषेचे ज्ञान होते यांमध्ये इंग्रजी , फेंच , जर्मनी , पर्शियन ,हिंदी , मराठी , गुजराती , पाली इ. या भाषांचा समावेश आहे .डॉ.बाबासाहेब यांनी कोलंबिया विद्यापीठातुन शिक्षण घेतले असून , त्यांचे शैक्षिणिक कार्य पाहून कोलंबिया या विद्यापीठांमध्ये , त्यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे .
या त्यांच्या प्रचंड ज्ञानामुळे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज या नावाने गौरविण्यात आले आहे .आजच्या 21 व्या शतकामध्ये डॉ.बाबासाहेब यांच्या इतके शिक्षण कोणीही घेवू शकले नाहीत .त्यांचे आपल्या भारतीय राज्यघटना तयार करण्यात मोलाचा वाटा होता , भारताचे संविधान हे लिखित स्वरुपात सर्वात मोठे संविधान आहे , त्यावेळी डॉ.बाबासाहेबांनी इतर अनेक देशातील लोकशाही देशातील संविधानाचा अभ्यास करुन आपले संविधान तयार केले आहे .
त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीमधील सर्वात मुख्य समिती असणारी मसुदा समितीचे अध्यक्ष होते . त्यावेळी त्यांनी सर्व घटकाला न्याय मिळेल , अशा पद्धतीने आपल्या संविधानाची रचना केली असल्याने , त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे संबोधले जाते .