निवडणुक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , परिपत्रक !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Election Recruit Employee provide facility paripatrak ] : विधानसभा निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद , सोलापूर कार्यालया मार्फत दि.05.11.2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

 सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , विधानसभा मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूकीचे कामकाज सुरु असून दिनांक 20.11.2024 रोजी मतदान आहे .

सदर मतदार संघात जिल्हा परिषद अंतर्गत शाळा / खाजगी शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत . त्या अनुषंगाने पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांची छतगळती दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या शिवाय मतदान केंद्राच्या ठिकाणी लाईट व पंख्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच पिण्याच्या पाण्याची सोय तसेच प्रधान गृहात पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याशिवाय प्रधानगृह सुस्थितीत करुन घेण्याचे , तसेच सदरील कामकाज ग्रामसेवक / तलाठी यांचे मार्फत बांधकाम विभागाशी संपर्क साधून मतदान केंद्राची भौतिक सुविधांचे कामकाज पुर्ण करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे आता मतदान केंद्रावर मतदान अधिकारी / कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत . परंतु जर काही ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास , संबंधित गावातील ग्रामसेवक / तलाठी जबाबदार असल्याचे नमुद आहेत .

Leave a Comment