दहावी बोर्ड परीक्षा 2025 बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; बोर्डाकडून परिपत्रक निर्गमित ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ssc board exme new update ] : इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2025 बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे . याबाबत बोर्डाकडून अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहे .

दहावी बोर्ड परीक्षा दरवर्षी माहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये घेण्यात येते , याकरिता अर्ज भरण्यास मुदत वाढ देणे बाबत बोर्डाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आली आहे. तर सुधारित वेळापत्रक नुसार दिनांक 06 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे आवेदन सादर करता येणार आहे .

तर 19 नोव्हेंबर नंतर पुढील दहा दिवस म्हणजेच दिनांक 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विलंब शुल्कासह आवेदन सादर करता येणार आहेत . सदर अर्ज अचूक भरल्याची खात्री संबंधित शाळा , महाविद्यालयाने करण्याचे निर्देश देण्यात आले असून अर्ज प्राप्तीनंतर विद्यार्थ्यांच्या  प्रिलिस्ट याद्या दिनांक 4 डिसेंबर पर्यंत बोर्डाकडे जमा करणे आवश्यक असणार आहे .

सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असून बरेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त आहेत , यामुळे सदर दहावी बोर्ड परीक्षेचे आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

तर यापूर्वीच बारावी बोर्ड परीक्षेच्या आवेदन सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे , यामध्ये दिनांक 31 ऑक्टोबर ते दिनांक 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे आवेदन सादर केले जाणार आहेत . तर त्यानंतर दिनांक 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विलंब शुल्कासह बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत .

Leave a Comment