@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ salaried Customers low intrest rate loan scheme ] : पगारदार ग्राहकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून स्टेट बँक ऑफ इंडिया पेक्षा कमी व्याजदरांमध्ये तब्बल 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते , याबाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे आहे .
कर्ज योजनेचे नाव : महा बँक पर्सनल लोन ( Personal Loan ) फॉर सॅलरीड कस्टमर्स , अशी असून , सदर कर्ज हे मुदत कर्ज आहे , सदर कर्जाचा उद्देश हा वैयक्तिक खर्चाच्या आवश्यकता पुर्ण करण्यासाठी दिले जाते .
पात्रता : सदर योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेण्याकरीता कस्टमर्सचे बँक ऑफ महाराष्ट्र इथवा इतर बँकेत सॅलरी खाते असणे आवश्यक असेल . तसेच केंद्र / राज्य अथवा सरकारी शैक्षणिक संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांमध्ये कायम स्वरुपात नोकरीस असणारे कर्मचारी ..
कर्जाची मर्यादा : सदर योजना अंतर्गत ग्राहकास 20 लाख रुपये कमाल मर्यादेपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते , तर याकरीता कोणत्याही प्रकारचे मार्जिन घेतले जात नाही , तर परफेडीसाठी कमाल 84 महिने कालावधी देण्यात येते .
SBI पेक्षा कमी व्याजदर : स्टेट बँक ऑफ इंडिया सॅलरी खात्यावर 11.80 टक्के व्याजदारने कर्ज देते , तर बँक ऑफ इंडिया मार्फत सॅलरी खाते असणाऱ्यांना सीबील नुसार वेगवेगळे व्याजदर दिले जाते .
यांमध्ये 800 व त्यापेक्षा अधिक सीबील असणाऱ्या सॅलरी खातेधारकांना सदर कर्जावर 8.35 टक्के व्याजदर आकारला जाते तर सीबीलच्या उतरत्या प्रमाणानुसार सर्वाधिक 10.40 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते .
याबाबत अधिक माहिती करीता / कर्ज घेण्यासाठी bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्या ..