@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance hike set at 56% from January 2025 – CPI index announced ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता मध्ये 3 टक्के डी.ए वाढ निश्चित झालेली आहे .
महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येतो . नुकतेच माहे डिसेंबर 2024 चा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागांकडून जाहीर करण्यात आल्याने , माहे जानेवारी 2025 मधील डी.ए अखेर निश्चित झाला आहे . मागील 06 महिन्यांचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डी.ए वाढ तक्ता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महिना | ACPI निर्देशांक | संभाव्य डी.ए वाढ |
जुलै 2024 | 142.7 | 53.50% |
ऑगस्ट 2024 | 142.6 | 53.80% |
सप्टेंबर 2024 | 143.5 | 54.20% |
ऑक्टोंबर 2024 | 144.5 | 55.20% |
नोव्हेंबर 2024 | 144.5 | 55.60% |
डिसेंबर 2024 | 143.7 | 56.00% |
माहे डिसेंबर 2024 चे निर्देशांक जाहीर झाल्याने , आता केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2025 पासुन 56 टक्के दराने डी.ए वाढ निश्चित झाली आहे . याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसुचना निर्गमित करण्यात येईल .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन 53 टक्के दराने डी.ए लागु करण्यात आलेला आहे , आता माहे जानेवारी 2025 पासुन यांमध्ये परत 03 टक्केची वाढ होणार आहे . ज्यामुळे एकुण डी.ए चे दर हे 56 टक्के इतके होणार आहे .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !